loader
Breaking News
Breaking News
Foto

पिल्लई कॉलेज, न्यू पनवेल येथे पनवेल शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक जनजागृती

पनवेल :- नवीन पनवेल येथील पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागातर्फे "सडक सुरक्षा, जीवन रक्षा" या संकल्पनेवर आधारित वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गजानन वाडेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्याचा होता. याप्रसंगी पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, तुकाराम कदम, पोलीस हवालदार युवराज येळे, अमीर मुलाणी, ज्ञानेश्वर पवार, केशव निकम आणि हनुमंत आंधळे यांच्यासह इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती दिली. रस्ते अपघातांमुळे देशाच्या जीडीपीमध्ये होणारी एक टक्का घट आणि दर चार मिनिटांनी एका युवकाचा होणारा मृत्यू ही आकडेवारी मांडत त्यांनी अपघातांच्या कारणांवर प्रकाश टाकला. रस्ते सुरक्षा हा पर्याय नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे सांगतानाच त्यांनी हेल्मेट वापरण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी उपस्थित एन.एस.एस. स्वयंसेवकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सामूहिक शपथ दिली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाहतूक शिस्त, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, पादचारी सुरक्षा आणि वाहन चालवताना मोबाईल वापरण्याचे धोके याविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि समन्वय मुख्य एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉक्टर शबाब रिझवी यांनी केले. नवी मुंबई पोलीस आणि पनवेल वाहतूक विभागाने राबवलेल्या या जनजागृती मोहिमेचे महाविद्यालय व्यवस्थापन, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg