loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली ‘लक्ष्मी ऑर्गेनिक पीफास विरोधी संघर्ष समिती’चा आवाज बुलंद

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC परिसरातील लक्ष्मी ऑर्गेनिक या कंपनीत पीफास (PFAS) नावाचे रसायन निर्मिती होत असल्याचा आरोप होत असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि संघर्ष समित्यांच्या म्हणण्यानुसार पीफास हे अत्यंत धोकादायक रसायन असून त्याचे परिणाम मानव आरोग्य, पाणी, माती आणि पर्यावरणावर गंभीर स्वरूपात दिसून येऊ शकतात. या संदर्भात नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरून असे सांगितले जात आहे की, इटलीमधील ‘मिटानी’ या कंपनीत याच प्रकारचे रसायन तयार केले जात होते. त्या रसायनामुळे तेथील साडेतीन लाखांहून अधिक लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडले, तर ४ ते ४.५ हजार लोकांचा मृत्यू झाला. इटली सरकारने चौकशी केल्यानंतर संबंधित कंपनीचे अधिकारी आणि मालक यांना १४-१४ वर्षांची कैदेची शिक्षा सुनावली गेली व कंपनी कायमची बंद करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिकांचा आरोप आहे की, त्या कंपनीतील एक डायरेक्टर जो साडेसहा वर्ष तुरुंगात होता, तोच आता भारतात येऊन याच प्रकारच्या उत्पादनाशी संबंधित आहे. शिवाय इटलीमध्ये पडून राहिलेली जुनी मशिनरी लिलावात अतिशय कमी किमतीत विकत घेऊन तीच मशिनरी येथे बसवण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोटे परिसरात मोठ्या प्रमाणात विरोध चळवळ उभी राहिली आहे.

टाइम्स स्पेशल

माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली ‘लक्ष्मी ऑर्गेनिक पीफास विरोधी संघर्ष समिती’ सक्रिय झाली असून त्यांनी या मुद्द्यावर व्यापक जनजागृती सुरू केली आहे. संघर्ष समितीने गावोगावी जाऊन पीफास रसायनाचे घातक परिणाम लोकांना समजावून सांगितले. आगामी काळात मोठा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीला तात्काळ टाळे ठोका, लोटे एमआयडीसी परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून शासनाने योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg