loader
Breaking News
Breaking News
Foto

दोन परप्रांतीयांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत; धारधार शस्त्राने हल्ला, तरुण गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी)- दोन परप्रांतीयांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. शाब्दिक बाचाबाचीनंतर एकाने दुसर्‍याच्या डोक्यात धारधार शस्त्राने हल्ला केल्याने लोकेश विष्ट (२२, रा. कणकवली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून पोलीस मारेकर्‍याचा शोध घेत आहेत. बुधवारी मध्यरात्री नंतर २ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील छत्रपती शिवाजी चौकाजवळ दोन परप्रांतीय तरुण एकमेकांशी भिडले. सुरुवातीला त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या एकाने लोकेश विष्ट याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. हा वार थेट डोक्यात लागल्याने लोकेश विष्ट रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलवडे आणि सहायक पोलीस निरीक्षक नागेश चिकने यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

टाईम्स स्पेशल

मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच हल्ला करणारा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. जखमी लोकेश विष्ट याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलवण्यात आले. या घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg