loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ होईल - बाबा मोंडकर

मालवण (प्रतिनिधी) - चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांचे पर्यटन व्यावसायिक महासंघाने आभार मानत असून त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात वाढ होणार आहे, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर दरवर्षी दहा लाख पेक्षा जास्त पर्यटक प्रामुख्याने सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देत असतात. यामध्ये देश-विदेशातील पर्यटक वाढण्यासाठी आवश्यक सुविधा राज्य व केंद्र सरकारकडून उपलब्ध होत असून विमान प्रवासासाठी उपयुक्त असलेली चिपी विमानतळाची भूमिका यात महत्वाची आहे हे ओळखून खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या विमानतळावर देशी-विदेशी पर्यटक बारमाही उतरण्यासाठी नाईट लँडिंग सुविधा आवश्यक होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी पाठपुरावा करून केंद्रीय वाहतूक मंत्रालय यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी माईलस्टोन ठरणार आहे. तसेच विद्युतीकरणासाठी अडीच कोटी रुपये पालकमंत्री नीतेश राणे यांनी उपलब्ध केल्याने चिपी विमानतळावर विमान वाहतूक दिवसरात्र सुरू राहणार असून देशी-विदेशी पर्यटकांमध्ये येणाऱ्या काळात वाढ होणार आहे, असे बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ला वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झाल्यानंतर जिल्ह्यातील हिस्ट्री ऐतिहासिक पर्यटन वाढ होत असून बीच टुरिझम, सोबत जंगल, साहसी, मेडिकल, धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. नाईट लैंडिंगमुळे या विमातळावर वाहतुकीसाठी उपलब्ध होणाऱ्या विमानांमुळे विमान संख्या वाढणार आहे. त्यामुळे जिल्हयात येणाऱ्या पर्यटकांसाठी आरामदायी सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हयातील होमस्टे, रिसॉर्ट, लॉजिंग बोर्डिंग व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्रात शाश्वत व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे, असेही मोंडकर म्हणाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg