loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड हादरले! ऐनवलीतील वीटभट्टीवर आढळली अल्पवयीन विवाहित जोडपी

खेड (रत्नागिरी) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील ऐनवली परिसरातील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये चक्क अल्पवयीन विवाहित बालिका आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयात झालेल्या तपासणीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऐनवली येथील एका वीटभट्टीवर परजिल्ह्यातून आलेले मजूर काम करत आहेत. या कामगारांच्या वस्तीवर दोन विवाहित अल्पवयीन जोडपी असल्याचे आढळून आले. या मुलींना तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी या बालिकांची वैद्यकीय तपासणी केल्यावर पुढील तपासासाठी पोलिसांना पाचरण केले. पोलीस या घटनेनंतर तातडीने घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्या अल्पवयीन (१८ वर्षांखालील) असल्याचे आणि त्यांचे विवाह झाल्याचे निष्पन्न झाले. ​रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. ​हे मजूर नेमके कुठल्या जिल्ह्याचे किंवा राज्याचे आहेत? ​या अल्पवयीन मुलींचे विवाह कधी आणि कुठे झाले? ​वीटभट्टी मालकाने या कामगारांची नोंदणी केली होती का? ​या सर्व बाबींचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

टाइम्स स्पेशल

संबंधित वीटभट्टी नेमकी कोणाच्या मालकीची आहे? आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांची ओळखपत्रे तपासली होती का? यादृष्टीनेही तपास सुरू आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. ​“अल्पवयीन मुलींच्या विवाहाबाबतची माहिती मिळताच आम्ही तपास सुरू केला आहे. संबंधितांचे जबाब नोंदवले जात असून कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.” असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg