दापोली (प्रतिनिधी) - शिवसेना आणि रुग्ण सेवा हे जणू शिवसेनेचे समिकरणच बनले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी सतत धावणाऱ्या रुग्णवाहिका असोत वा उपचारासाठी तसेच आरोग्यमान तपासणीसाठी आरोग्य शिबारांचे आयोजन करण्याचे काम असो, अशा या सामाजिक बांधिलकीच्या कामांची शिवसेनेची बरोबरी इतर कुणीही करूच शकत नाही अशाच प्रकारे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली तालूका मुंबई उपसंघटक दिनेश गणपत मालप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि संयोजनाने केळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्याला जडलेल्या विविध व्यांधीची तपासणी करत शिवसेनेने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आणि एकाच छताखाली मिळालेल्या वैद्यकीय सेवेच्या शिवसेनेच्या या सामाजिक बांधिलकीच्या कामाचे मनोमन समाधान व्यक्त केले.
दापोली तालुक्यातील केळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली तालूका मुंबई संघटनेचे उप संघटक दिनेश गणपत मालप यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि संयोजनाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात प्रामुख्याने नेत्र तपासणी, डायलेसीस, हायपर टेन्शन, रक्त तपासणी, कॅन्सर तपासणी, हृदयरोग तपासणी, जनरल तपासण्या करण्यात आल्या. तसेच पीएमजेएवाय कार्ड काढण्यात आले. या सर्व तपासण्या करण्यासाठी वसई येथील मेडिप्राईम हाॅस्पिटलची तज्ञ डॉक्टरांची टिम आली होती. यामध्ये डॉ. प्रशांत प्रजापती, आकाश तानावडे, चेतन मिटना, अंकिता तावडे यांचा समावेश होता. या वैद्यकीय टिमला केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली गुहागरकर, डॉ. योगेश्वरी राठोड, आरोग्य सहाय्यक जनार्दन घरटकर, जे.एम.आयरे, औषधनिर्माण अधिकारी चित्ते, आरोग्य सेविका पवार, सीएचओ आंधळे, सीएचओ सोनवणे, आरोग्य सेवक लांजेकर, आशासेविका कुडेकर, पाटील, जाधव, मिसाळ, मांडवकर, गटप्रवर्तक बोरकर आदींनी मदत करत मोठे सहकार्य केले.
या कार्यक्रमाला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष मुजिब रुमाणे, तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, उप तालुकाप्रमुख महेंद्र रेवाळे, केळशी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद ऊर्फ राजू विध्दांस, माजी सरपंच शेखर केळसकर, उंबरशेत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यशवंत बटावले, माजी पंचायत समिती सदस्या अनन्या रेवाळे, विभाग समन्वयक विजय साबळे विभाग प्रमुख योगेश रहाटवळ यांनी भेट दिली आणि संयोजकांचे कौतुक केले. हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय जाधव, निलेश गुहागरकर, दिशा दिनेश मालप, सुदर्शन पाटील, अक्रम मुकादम श्रीधर खांबे, वैभव धाडवे, रामचंद्र बंगाळ, मुनावर मुकादम, अकबर मुकादम, विनायक जाधव, बळीराम उके, लक्ष्मण मालप, किशोर मिसाळ, श्रीकांत निवाते, मंगेश महाडिक, हरिश्चंद्र गावणूक, सुचिता निवाते, सुनिता मालप, रंजना शिगवण, सरिता गोरीवले, शुभांगी मालप, रंजना गावणूक, सुगंधा मिसाळ आदींसह शिवसेना,यूवासेना, यूवतीसेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि उपचारकर्त्यांना आरोग्य विषयक सोयी सुविधांचा लाभ मिळवून दिला.









































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.