loader
Breaking News
Breaking News
Foto

दि. बां. च्या "जन्मशताब्दी वर्षानिमित्त" रक्तदान शिबिर

पनवेल :- पनवेल उरण आगरी समाज मंडळ, पनवेल आयोजित लोकनेते दि.बा. पाटील यांच्या "जन्मशताब्दी वर्षानिमित्त" रक्तदान शिबिर मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आले होते. शिबिराला सहकार्य "लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब २७ गाव संघर्ष समिती, रुधीरसेतू सेवा संस्था, राजस्थानी महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले. शिबीराचे उद्घाटन सुप्रसिध्द शल्यविशारद डॉ. गिरीश गुणे यांनी केले. शिबीराला निवडणुकीच्या व्यस्त जीवनातून वेळ काढत लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर, डॉ. नितीन म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर यांनी भेट दिली. एकूण ८७ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून लोकनेते दि.बा. पाटील यांना आदरांजली वाहिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व रक्तदात्यांना पनवेल उरण आगरी समाज मंडळातर्फे आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र डॉक्टर, मान्यवरांचे व मंडळाचे अध्यक्ष अतुल दि. बा. पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, सचिव बी. पी. म्हात्रे, कोषाध्यक्ष विजय द. गायकर यांचे हस्ते देण्यात आले. या शिबीरासाठी विद्याधर पाटील, गणेश दाभणे यांनी सहकार्य केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg