loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रपती पुरस्कार विजेते, निवृत्त पोलीस अधिकारी विश्वासराव भोसले यांचेकडून बिजघर नं. १ शाळेला स्पोर्ट्स किट्सचे वाटप

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील दुर्गम भागातील बिजघर नं. १ शाळेच्या तालुकास्तरावर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या दहा मुलांसाठी बिजघर मावळतवाडी येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विश्वासराव दिनकरराव भोसले यांच्याकडून त्यांचे वडील स्वर्गीय दिनकरराव नारायणराव भोसले यांच्या स्मरणार्थ स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले. विश्वासराव दिनकरराव भोसले यांच्या फार्म हाऊसवर विश्वासराव भोसले यांचे मोठे बंधू सदाशिव भोसले व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले हे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी सदाशिव भोसले, निवृत्त कॅप्टन साहेब राजारामराव भोसले, निवृत्त पोलीस अधिकारी नारायणराव भोसले, निवृत्त नेव्ही अधिकारी राजेंद्र भोसले, राम रघुनाथराव भोसले, राजेंद्र वामन भोसले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे खेड तालुकाध्यक्ष विजय येरुणकर, बिजघर सरपंच शुभांगी भोसले, सामाजिक कार्यकर्ते सचिन राजारामराव भोसले, संजय सदाशिव भोसले, कमलेश भोसले, दशरथ भोसले, गुलाब भोसले, अनाजी भोसले, वैशाली भोसले, राजश्री भोसले, प्रेमा भोसले, सुप्रिया भोसले, सुप्रिया चव्हाण, सोनाली भोसले, मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शिक्षक विजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर व गावातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg