loader
Breaking News
Breaking News
Foto

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दि. ८ जानेवारी रोजी “तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंध” विषयावर कार्यशाळेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) - आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी “तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंध” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा मानसिक ताण, तणाव हाताळण्याच्या प्रभावी पद्धती तसेच आत्महत्येपासून प्रतिबंधासाठी आवश्यक जनजागृती या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तणाव ओळखणे, त्यावर उपाययोजना, सकारात्मक जीवनशैली, समुपदेशनाचे महत्त्व व आत्महत्या प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित राहणार असून कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

टाइम्स स्पेशल

या प्रशिक्षण वर्गाकरिता संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यशाळेत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ. एन. वी गवळी व मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर एम गुलदे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg