loader
Breaking News
Breaking News
Foto

नव्या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी; आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

दापोली (शशिकांत राऊत) - सन २०२६ या नव्या वर्षात मंगळवारी ६ जानेवारीला पहिलाच अंगारकी चतुर्थीचा योग आला या अंगारकी चतुर्थी निमित्त आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अंगारकी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी भली मोठी रांग लागलेली असतानाही श्री कडयावरील गणपती मंदिर देवस्थान व्यवस्थापनाने दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविक भक्तगणांना व्यवस्थित आणि समाधानाने दर्शन मिळावे यासाठी उत्तम व्यवस्था हाताळल्याने येथे दर्शनासाठी आलेल्या सर्वच भक्तगण भाविकांना आपल्या मनोजोगे श्रीं चे दर्शन घेता आले. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात असे भक्तगण मानतात.अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणले जाते. गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. भक्तगण अंगारकी चतुर्थीचे व्रत करतांना घरोघरी गणेशाची पूजा करतात. त्याचप्रमाणे या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव "अंगारक" हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. अशा या अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थी व्रतांचे पुण्य प्राप्त होते सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते आर्थिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक अडचणी दूर होतात अशाप्रकारची भाविक भक्तगणांची श्रध्दा आहे. त्यामुळे मंगळवारी ६ जानेवारी २०२६ रोजी सन २०२६ या इंग्रजी वर्षात पहिलाच अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील सुप्रसिध्द कडयावरील गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आंजर्ले, हर्णे, पाजपंढरी, आडे उटंबर केळशी परिसरासह संपुर्ण दापोली तालुक्यातील तसेच रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने श्रीं च्या दर्शनासाठी येथे आलेले होते.

टाइम्स स्पेशल

दापोली तालूक्यातील आंजर्ले हे गाव कडयावरील श्रीं गणपती देवस्थानसाठी सुप्रसिद्ध असे ठिकाण आहे. अशा या आंजर्ल्याच्या एका टेकडीवर श्री गणपती विराजमान आहेत. त्याला सारे जण कड्यावरचा गणपती असे म्हणतात. अशा या कडयावरील गणपती मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे वर्णन शब्दांत करणे तसे कठीणच जाते. श्री गजाननाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला लाभणारी प्रसन्नता आणि शांती या दोन्ही गोष्टी केवळ अनुभवावयच्याच आहेत. गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीवर विलक्षण तेज आढळते. पाच फूट उंचीची मूर्ती पूर्वाभिमुख असून शेजारील रिद्धि सिद्धिच्या मूर्ती सुमारे एक फूट उंचीच्या आहेत. कड्यावरचा गणपती अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अशा या आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात तसे कायमच भक्त गण हे दर्शनासाठी येत असले तरी विशेषतः संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी खुपच मोठी गर्दी होत असते तसे आज अंगारकी चतुर्थीला कडयावरील श्रीं गणपती देवस्थानच्या दर्शनासाठी भाविक भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. कड्यावरील श्री गणपती देवस्थान, आंजर्ले यांनी उत्तम व्यवस्था ठेवल्याने दर्शनासाठी येथे आलेल्या सर्व भाविक भक्त गणांना अगदी मनोभावे दर्शन घेता आले. हे या देवस्थान कमिटीच्या व्यवस्थापनाचे आणि येथील कर्मचारी सेवेक-यांचे खरे यश म्हणावे लागेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg