loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी पोलीस स्थापना दिनानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन, नगरपरिषद संघ विजेता, तर महसूल विभाग उपविजेता

सावंतवाडी (प्रतिनिधी) सावंतवाडी पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे आवारात आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत सावंतवाडी नगरपरिषद संघाने अजिंक्यपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत महसूल विभाग, सावंतवाडी हा संघ उपविजेता ठरला.या स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व प्रशासनातील अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शासकीय विभागांमधील समन्वय वाढावा आणि खेळाडूवृत्ती जोपासली जावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत प्रशासनातील विविध विभागांच्या सहा प्रमुख संघांनी सहभाग नोंदवला होता, त्यामध्ये पत्रकार संघ, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपरिषद, वनविभाग व स्थानिक संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत नगरपरिषद आणि महसूल विभाग यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. अखेर नगरपरिषदेच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg