loader
Breaking News
Breaking News
Foto

राजवाडा सावंतवाडी येथे दि. ७ ते १० जानेवारी दशावतार महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व लोककला विभाग आयोजित लोककला महोत्सव २०२६ च्या अंतर्गत चौथा दशावतार महोत्सव दि.७ ते १० जानेवारी या कालावधीमध्ये राजवाडा सावंतवाडी येथे सायंकाळी ६.३० ते १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. दिव्यलोकीचा आभास निर्माण करणारी, इंद्रधनुष्य रंगांची उधळण करणारी रंगभूषा व वेशभूषा, उत्कृष्ठ खटकेबाज, उस्फुर्त संवादाची जोड लाभलेला रांगडा अकृत्रिम अभिनय, पखवाज किंवा तबला, पायपेटी आणि झांजेची लायकारी साथ लाभलेले संगीत या वैशिष्ट्यांसह भाविक लोकरंगभूमीवर अवतीर्ण होणारा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लोककला आविष्कार म्हणजे आपला दशावतार.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जुनी पारंपारिक दशावतार कला जिवंत ठेवण्यासाठी तिथे जतन करण्यासाठी व ती वृद्धिंगत करण्यासाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित व्हावा या उद्देशाने संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखम सावंत भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने पारंपरिक दशावतार मंडळांचा दशावतार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. समस्त कलापेयींनी आपल्या लोककलाकारांच्या लोककलाविष्काराचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दि.७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता नाईक मोचेमांडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमांड, वेंगुर्ला यांचा 'नीलमाधव 'व रात्री ८.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा 'गोमय गणेश' दि.८ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा 'वेसरोत्पत्ती 'तर रात्री ८.३० वाजता जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली, आरोस यांचा 'गरुड गर्वहरण'

टाइम्स स्पेशल

दि.९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवन कुडाळ यांचा 'भक्ती महिमा' तर रात्री ८.३० वाजता श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कसई दोडामार्ग यांचा 'चौरंगीनाथ ' हा नाट्य प्रयोग होणार आहे. दि.१० जानेवारी रोजी चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी, कुडाळ यांचा 'क्षणमुखासूर रूपिणी संहार, तर रात्री ८.३० वाजता श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचा 'धर्मविजय' हा प्रयोग सादर केला जाणार आहे. तरी या दशावतार महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.डी.एल भारमल यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg