loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणनगर भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अपूर्वा सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न

रत्नागिरी - फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकणनगर आयोजित आमदार किरण भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या (२०२६) बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्या कु.अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सोबत रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.पूजाताई पवार, सौ.आफ्रीन होडेकर, सौ.रुख्सार खान, सौ.फौजिया मुजावर, रज्जाकशेठ काझी, दिपक पवार, इलियास खोपेकर, तन्वीर मुजावर, जकी खान आणि फैसल मुल्ला मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच खेळाडू, क्रीडाप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अंतिम सामन्यात रत्नदीप पाटीलवाडी या संघाने आहिल वॉरीअर घुडेवठार या संघावर मात करून चषकावर आपले नाव कोरले. विजेत्या संघास रोख रक्कम आणि आकर्षक चषक तसेच उपविजेत्या संघास रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर पारितोषिक गौरव नागवेकर याला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत एकूण ३२ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेस ०४ जानेवारी रोजी सुरुवात करण्यात आली आणि ०८ जानेवारी रोजी अंतिम सामना खेळवण्यात आला. ५ दिवस चालणार्‍या कठीण परिस्थितीच्या मैदानावर सुंदर असे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कु.अपूर्वा सामंत यांनी भरभरून कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg