loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू मैदानात, बहुप्रतिक्षित राज-उद्धव ठाकरेंच्या सभेचा ठरला मुहूर्त

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र मैदानात उतरले आहेत. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी महापालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच अधिकृत युती जाहीर केली आहे. या युतीला यशस्वी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः रणनीती आखून कामाला लागले आहेत.गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईतील विविध भागांमध्ये शाखा भेटी देत आहेत. या भेटींमधून कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला जात आहे. संघटनात्मक बांधणी, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी, तसेच निवडणूक तयारीचा आढावा या भेटींमागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. या दौऱ्यांदरम्यान स्थानिक प्रश्न, प्रभागनिहाय ताकद आणि उमेदवार निवडीबाबतही दोन्ही नेते गांभीर्याने चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर या सभेची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 11 जानेवारी रोजी मुंबईतील शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भव्य सभा पार पडणार आहे. या सभेतून मनसे–शिवसेना युतीची ताकद दाखवून देण्याचा आणि महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याचा दोन्ही पक्षांचा मानस आहे.

टाइम्स स्पेशल

या सभेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीचा रोडमॅप जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विकासाचा आराखडा, मराठी अस्मिता, स्थानिक प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांवर टीका असा आक्रमक सूर या सभेत पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. तसेच, कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधू थेट आवाहन करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg