loader
Breaking News
Breaking News
Foto

बहुजन समाज पार्टी रत्नागिरी जिल्ह्यात स्वबळावर ताकदीनिशी जि. प., पं. स. निवडणुक रिंगणात उतरणार - जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चंडे

(रत्नागिरी) - जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष उतरले आहेत, त्यात बहुजन समाज पार्टी हा देशातील तिसरा क्रमांकाचा राजकीय पक्ष ही मागे नाही. येणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बहुजन समाज पार्टी स्वबळावर पुर्ण ताकदीनिशी निडणुक रिंगणात उतरणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चंडे यांनी जाहीर केले आहे. सावित्रीमाई फुले जयंती दिनी बहुजन समाज पार्टी ची महाराष्ट्र प्रदेश कमिटी ची बैठक "बिएसपी भवन" चेंबुर, मुंबई येथे पार पडली. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय प्रभारी माजी खासदार राजाराम, प्रदेश अध्यक्ष सुनिल डोंगरे उपस्थित होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहेन मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार बहुजन समाज पार्टी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चंडे यांनी सांगितले की, वरिष्ठ नेत्यांच्या सुचनांनुसार पक्ष स्वबळावर निवडणुक रिंगणात उतरणार आहे परंतु या महाराष्ट्राचे राजकारण महानगरपालिका निवडणुकीत पाहीले तर भाजप-शिवसेना महायुतीकडून विरोधी उमेदवारच विकत घेतले जात आहेत, अर्ज मागे घेण्यासाठी दबावतंत्र धनशक्तीच्या माध्यमातुन वापरले जात आहे, हा विचार करुन स्थानिक पातळीवर बहुजन समाजातील बौध्द, कुणबी-ओबीसी, अनुसुचित जमाती, मुस्लीम समाजाचे मत विभाजन होउ नये म्हणुन समविचारी पक्ष यांना सोबत घेउन सकारात्मक बोलणी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे ही सांगितले. कारण रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत बहुजन समाज पार्टी ने शिवसेना-उबाठा, वंचित बहुजन आघाडी आणि रिपाई (गवई गट) यांना सोबत घेउन चांगली ताकद घेउन दुसरा क्रमांकाची मते घेतली आहेत.

टाइम्स स्पेशल

हाच विचार करुन बसपा चे महाराष्ट्र प्रभारी राजपाल गावंडे, कोकण झोन प्रभारी संतोष कासारे, झोन प्रभारी सचिन रुके, रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रभारी सचिन मोहीते तसेच जिल्हा, विधानसभा कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या समोर चांगले प्रदर्शन करुन बहुजन समाजातील महापुरुषांच्या समता, बंधुतावादी विचारावर नक्कीच आगेकुच करेल, असा आशावाद बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रविण मर्चंडे यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg