loader
Breaking News
Breaking News
Foto

पालशेत–अडूर–वेळणेश्वर रस्त्याची अक्षरशः चाळण; वाहनचालकांचे कंबरडे मोडले

वरवेली (गणेश किर्वे) - पर्यटन, व्यापार आणि जलमार्गाने रत्नागिरीला जोडणारा सागरी महामार्ग म्हणून ओळखला जाणारा पालशेत-अडूर-वेळणेश्वर-हेदवी-तवसाळ हा महत्त्वाचा मार्ग सध्या पूर्णतः खड्डेमय झाला असून नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. रस्ता नाही तर खड्‌ड्यांचे कब्रस्तान अशीच या मार्गाची अवस्था झाली आहे. खड्डेमुक्त, सुरक्षित, नीटनेटके आणि वाहनसुलभ रस्ते हा काही ऐच्छिक विकास नव्हे, तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत हमी दिलेला जीवनाचा मूलभूत अधिकार आहे. वेळणेश्वर, हेदवी व तवसाळ येथून पुढे जलमार्गाने रत्नागिरीला जोडणारा हा रस्ता विकासाचा कणा मानला जातो. मात्र आज या रस्त्यावर जागोजागी पडलेले खोल खड्डे, उखडलेले डांबर आणि खचलेले कडे पाहता सागरी महामार्गाचा दर्जा कुठे गेला? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः पालशेत, अडूर आणि वेळणेश्वर या भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मार्गावरून धावणार्‍या वाहनांची वरचेवर दुरुस्ती व देखभाल करावी लागत असून सर्वसामान्य वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. सस्पेन्शन, टायर, रिम, चाक, स्टेअरिंग यांचे नुकसान नित्याचे झाले आहे. या परिस्थितीमुळे वाहनचालकांचे आर्थिक नुकसान, शारीरिक त्रास आणि मानसिक तणाव कमालीचा वाढला आहे. हा रस्ता वापरणे म्हणजे रोज पैसे, आरोग्य आणि मानसिक शांतता गमावणे आहे, अशी प्रतिक्रिया संतप्त वाहनचालक व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी भयावह होते. पाण्याखाली लपलेले खड्डे अपघातांना निमंत्रण देत असून दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक व रुग्णवाहिका सर्वच धोक्यात सापडत आहेत. तरीही संबंधित यंत्रणा बघ्याची भूमिका घेत बसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासन एखादा जीव गेल्यावरच हलणार आहे का? असा संतप्त सवाल आता खुलेआम विचारला जात आहे. तरी तातडीने या सागरी महामार्गाची डागडुजी किंवा संपूर्ण पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg