loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा प्रभाग २ मध्ये प्रचार दौरा

पनवेल (प्रतिनिधी) :- पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजप महायुतीचा प्रचार जोरात सुरू असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदार व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत प्रचाराला नवी ऊर्जा दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रभाग क्रमांक २ मधून भाजप महायुतीचे उमेदवार दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, काजल पाटील आणि अरुणा दाभणे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित दौऱ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, वाय. टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले की, पनवेलचा सर्वांगीण व वेगवान विकास साधायचा असेल तर केंद्र, राज्य आणि महापालिका या ‘ट्रिपल इंजिन’ सरकारची ताकद सत्तेवर असणे आवश्यक आहे. यापूर्वी महापालिकेत आपले ६६ नगरसेवक होते. यंदाच्या निवडणुकीत केवळ ६६ वर न थांबता त्याहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुढे बोलताना ते म्हणाले, आता मी आणि जे. एम. म्हात्रे एकत्र आलो असून त्यामुळे आपली ताकद अधिक वाढली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय तसेच इतर मित्रपक्षांचीही मजबूत साथ महायुतीला लाभत आहे. त्यामुळे या प्रभागातील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रचार दौऱ्यात भाजप नेते जितेंद्र म्हात्रे, महेश पाटील, अशोक साळुंखे, राजू शेळके, रामदास फडके, काळूराम फडके, महेंद्र म्हात्रे, आकाश फडके, रूपेश फडके, विजय म्हात्रे, विजय पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg