loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था (ngo), ट्रस्ट आणि स्वयंसहायता बचत गट समूह यांच्याकरिता कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) धोरणाअंतर्गत २०२६ या आर्थिक वर्षासाठी विविध कंपन्यांकड्रन सामाजिक उपक्रमांसाठी मोठ्य प्रमाणावर निधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि ट्रस्ट यांनी आतापासनच नियोजनपूर्वक तयारी सुरू करण्याचे आवाहन सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्यअध्यक्षा डॉ. सौ. सुनिताताई मोडक यांनी केले आहॆ. आणि त्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांची कार्यशाळा, रविवार, दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी, माध्यमिक शिक्षक पतसंस्था सभागृह, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहॆ.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्था, ट्रस्ट यांच्याकरिता २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. स्वयंसेवी संस्थांनी आपली नोंदणी कागदपत्रे, १२A व ८०G प्रमाणपत्रे,लेखापरीक्षित अहवाल, मागील कामाचा अनुभव तसेच प्रभावी प्रकल्प अहवाल तयार ठेवणे अत्यावश्यक आहे. CSR मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शकता आणि परिणामकारकता दाखविणाच्या संस्थांना निधी मिळण्याची शक्यता अधिक असते. कंपनी कायदा २०१३ नुसार ठराविक उलाढाल व नफा असलेल्या कंपन्यांना त्यांच्या सरासरी नफ्याच्या किमान २ टक्के रक्कम सामाजिक उपक्रमांसार्ठी खर्च करणे बंधनकारक आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण,पर्यावरण, संरक्षण, ग्रामीण विकास, कौशल्य विकास आणि डिजिटल साक्षरता या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संस्थांसाठी राज्यातील अनेक औद्योगिक समुह, आयटी कंपन्या आणि उत्पादन क्षेत्रातोल उद्योग २०२६ साठी त्यांच्या CSR योजना लवकरच जाहीर करणार असल्याने, इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी कंपन्यांशी संवाद साधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची तयारी आतापासूनच करावी.

टाइम्स स्पेशल

सदर कार्यशाळेचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते राजू भाटळेकर, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती, राज्य सह सचिव श्री प्रताप पवार, जिल्हाध्यक्षा संजना मोहिते, प्रकोष्ठ समिती जिल्हाध्यक्षा वर्षा राजे निंबाळकर,उपाध्यक्ष विकास चव्हाण, प्रसाद मोहरकर,राज्यसदस्य किशोर सावंत,विनायक खानविलकर, नुपूरा मुळ्ये, अविनाश ऊर्फ राजू जाधव,प्रभाकर धावडे, संतोष घुमे, विनय पाटोळे, रक्षिता पालव,सलोनी मोरे,राजेश आंबेकर, अंतरा मोहिते,संजय भागवत आदी पदाधिकारी करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg