loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस.महाविद्यालयाचा क्रिकेट संघ कोकण विभागीय स्पर्धेसाठी पात्र

खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने क्रिकेट स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. मुंबई विद्यापीठ, रत्नागिरी जिल्हा अंतर्गत लांजा येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आयसीएस महाविद्यालयाच्या संघाने दमदार कामगिरी करत कोकण विभागासाठी पात्रता मिळवली. आयसीएस महाविद्यालयाचा पहिला सामना फिनोलेक्स महाविद्यालय, रत्नागिरी संघाविरुद्ध झाला. नाणेफेक जिंकून फिनोलेक्स संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आय.सी.एस. महाविद्यालयाकडून सलामीला उतरलेल्या जो. रुबेनसन परदेशी याने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ७९ चेंडूंमध्ये नाबाद १६८ धावांची तुफानी खेळी केली. त्यांच्या जोरावर आय.सी.एस. संघाने २० षटकांत ७ बाद २११ धावा केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिनोलेक्स महाविद्यालय, रत्नागिरी संघ २० षटकांत १७२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी आयसीएस महाविद्यालयाने ४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरा सामना नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी संघाविरुद्ध खेळवण्यात आला. आयसीएस महाविद्यालयाच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव सर्व गडी बाद ७३ असा गडगडला. आय.सी.एस. कडून पार्थ घाग याने २, श्रीजय आंब्रे आणि अब्दुल गणी यांनी प्रत्येकी १, तर जो. रुबेनसन परदेशी याने ४ बळी घेतले. आय.सी.एस. महाविद्यालयाने ७४ धावांचे लक्ष्य अवघ्या ५ षटकांत बिनबाद ७५ धावा करत पूर्ण केले. सलामीवीर फैसल पारकर याने ५ चेंडूंमध्ये ८ धावा, तर जो. रुबेनसन परदेशी याने २४ चेंडूंमध्ये ६४ धावांची अष्टपैलू खेळी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

टाइम्स स्पेशल

या दोन सलग विजयांसह आय.सी.एस. महाविद्यालयाचा क्रिकेट संघ कोकण विभागासाठी पात्र ठरला. प्रा रोहित कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संघाच्या या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg