loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली रोटरी क्लबकडून तहसील कार्यालयासाठी बकेट प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली तहसीलदार कार्यालयात आणि परिसरात प्लास्टिक कचरा कुणीही बाहेर टाकू नये, तसेच या परिसरात स्वच्छता व्हावी या चांगल्या हेतूने कणकवली येथील रोटरी क्लब कडून तहसीलदार कार्यालयाला चार मोठी कचरे बकेट प्रदान करण्यात आली. या बकेटमुळे कार्यालय व परिसर स्वच्छ राहील असे सांगत कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी आनंद व्यक्त केला. स्वच्छतेसाठी रोटरी क्लब सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही कणकवली रोटरी क्लबचे अध्यक्ष सुप्रसिद्ध वकील ॲड.राजेंद्र रावराणे यांनी दिली. कणकवली शहरातील तहसीलदार कार्यालय हे नेहमी गजबजलेले असते. दररोज शेकडो लोक विविध कामांसाठी कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात गर्दी करतात. कामासाठी येणाऱ्या लोकांना विविध सुविधा पुरवीता याव्यात यासाठी तहसीलदार दीक्षांत देशपांडे नेहमी प्रयत्नशील असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यातूनच कार्यालय व परिसर स्वच्छ रहावा यासाठी कचरा बकेट पुरवावीत, असा प्रस्ताव तहसीलदार देशपांडे यांनी कणकवलीतील रोटरी क्लब पुढे ठेवला होता. या प्रस्तावाला सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ने सकारात्मक प्रतिसाद दिला. तहसीलदार कचेरी व परिसर स्वच्छ रहावा यासाठी ही नागरिकांची गरज आहे. ही गरज ओळखून रोटरी क्लबने तात्काळ तब्बल चार बकेट तहसीलदार कार्यालयाला प्रदान केली. बुधवारी सकाळी कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात ही बकेट प्रदान करण्याचा छोटेखानी कार्यक्रम झाला. यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार मंगेश यादव, रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड राजेंद्र रावराणे, डाॅ.विद्याधर तायशेट्ये, ॲड दिपक बेलवलकर, राजश्री रावराणे, नगरसेविका मेघा गांगण, महेंद्र मुरकर, अनिल कर्पे, बेहराराम राठोड, प्रमोद लिमये, लवू पिळणकर, ॲड दिपक अंधारी, गणेश जेठे व इतर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

स्वच्छता ही देशाची गरज असून नेहमी गजबजलेले तहसीलदार कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही हे बकेट पुरवत आहोत, या कार्यालयाला आणखी काही सुविधांची गरज भासली तर तीही आम्ही पुरवायला तयार आहोत असे, ॲड. राजेंद्र रावराणे यांनी सांगितले. तहसीलदार देशपांडे यांनी रोटरी क्लब करत असलेले काम ही देशसेवा आहे. यापुढेही या कामासाठी रोटरी क्लब ने सहकार्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्लॅन तयार करून त्यावर सर्वांनी मिळून काम करूया असे आवाहनही ॲड.रावराणे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg