loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन; निसर्ग संवर्धन चळवळीचा 'रक्षणकर्ता' हरपला

सावंतवाडी (प्रतिनिधी) - पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आणि जगप्रसिद्ध ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील निसर्ग संवर्धन चळवळीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून, सह्याद्रीचा एक खरा रक्षणकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ​सहा राज्यांतून जाणाऱ्या पश्चिम घाटाच्या (सह्याद्री पर्वत रांगा) संरक्षण आणि संवर्धनासाठी माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर लढा दिला. कोकणासह संपूर्ण पश्चिम घाटात होणारी वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास करणारी मायनिंग आणि प्रदूषणकारी प्रकल्पांना त्यांनी सातत्याने विरोध दर्शवला होता. येथील विपुल वनसंपदा आणि जैवविविधतेचे रक्षण व्हावे, यासाठी त्यांनी मांडलेला 'माधव गाडगीळ अहवाल' (WGEEP Report) हा आजही निसर्गप्रेमींसाठी मार्गदर्शक मानला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गाडगीळ सरांचे मार्गदर्शन पुढील पिढीला निसर्ग आणि वन्यजीव वाचवण्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ​"गाडगीळ सरांचा अहवाल हा निसर्ग संरक्षणासाठी वेद-उपनिषदांइतकाच महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली ते मांगेली हा सह्याद्रीचा पट्टा 'इको सेन्सिटिव्ह' (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील) जाहीर होणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल." — डॉ. जयेंद्र परुळेकर, स्टॅलिन दयानंद (संचालक, वनशक्ती), व संदीप सावंत यांनी म्हटले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी दिलेला अहवाल आजही जगभरात चर्चिला जातो. पर्यावरणाचे रक्षण करताना स्थानिकांचा सहभाग असावा, यासाठी ते आग्रही होते. मायनिंगऐवजी हरित प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ​त्यांच्या जाण्याने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून दुःख व्यक्त होत असून, पर्यावरणप्रेमींकडून त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg