loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्ह्यात बॉक्साइट उत्खननामुळे पर्यावरणाला धोका

संगलट, खेड (प्रतिनिधी) : सध्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी होत असलेल्या बॉक्साइट उत्खननामुळे परिसरातील डोंगररांगा अक्षरशः भुईसपाट झाल्या असून डोंगरावरील नैसर्गिक हिरवळ नष्ट झाली आहे. ज्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे त्या परिसरात भलेमोठे बॉक्साइटचे ढिगारे साचलेले दिसून येत असून, उर्वरित भागात मात्र नैसर्गिक हिरवळ टिकून असल्याचे चित्र आहे. यामुळे पर्यावरणीय असमतोल स्पष्टपणे जाणवत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उत्खननाचा दीर्घकालीन परिणाम भविष्यात नागरिकांच्या आयुष्यावर गंभीर स्वरूपाचा होण्याची शक्यता असून, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. डोंगरांची तोड आणि मातीचा समतोल बिघडल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी बॉक्साइट उत्खननाला अनेक वेळा विरोध दर्शवला असला, तरी प्रशासन व संबंधित शासकीय यंत्रणांनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात डोळेझाक केल्याचे चित्र निर्माण झाले असून, नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना तीव्र होत आहे. दरम्यान, या उत्खननातून काही राजकीय घटकांना आर्थिक लाभहोत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहेत.

टाइम्स स्पेशल

शासनाने बॉक्साइट उत्खननास परवानगी देताना स्थानिक नागरिकांच्या गरजा, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच पर्यावरणीय परिणाम यांचा विचार करणे आवश्यक होते. या परिसरातील वन्यजीव व जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांकडे वनविभागानेही दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. शासनाचे नाव पुढे करून संबंधित बॉक्साइट कंपनी उत्खनन करत असली, तरी शासनाने घालून दिलेल्या अटी व शतींचे काटेकोर पालन होत आहे का, याची तपासणी करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. पर्यावरणीय मंजुरी, प्रदूषण नियंत्रण, पुनर्वनीकरण आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अटींची अंमलबजावणी होते की नाही, यावर प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg