loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत मराठी पत्रकार दर्पण दिन उत्साहात साजरा

दापोली प्रतिनिधी : मराठी पत्रकारितेचे जनक तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दापोलीतील पत्रकारांनी मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा केला. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या निर्भीड, प्रबोधनात्मक आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा ठाम निर्धार उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला. मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची जबाबदारी अधिक प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास पत्रकार शिवाजी गोरे, प्रवीण शिंदे, यशवंत कांबळे, प्रतीक तुपे, महादेव शिरगावकर,बाळासाहेब नकाते, विद्यमान गुरव, सौ. समिधा, मंगेश जाधव यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. सत्य, निर्भीडता आणि जनहित जपणारी पत्रकारिता हीच बाळशास्त्री जांभेकर यांना खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg