loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड एस. टी. स्टॅण्डशेजारी मटका जुगार खेळविणाऱ्यावर गुन्हा दाखल

खेड : येथील एस. टी. स्टॅण्डशेजारी असलेल्या खामकर गुळाचा चहा याठिकाणी मटका जुगार शुभ अंकावर पैसे लावून खेळ खेळवित असताना रंगेहाथ मिळून आलेल्या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई दि. ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कारवाईत रंगेहाथ मिळून आलेल्या भरत आत्माराम उसरे (वय- ४८, रा. भडगांव- उसरेवाडी, ता. खेड) याच्याकडून रोख रक्कम रुपये ९८०/-आणि ५५/- रुपयांचे इतर जुगार साहित्य असा एकूण रुपये १०३५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथील खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई शिरीष अशोक साळुंके यांनी फिर्याद दिल्यानुसार संशयित आरोपी भरत आत्माराम उसरे याच्याविरोधात गुन्हा रजि.नं. ०४/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg