loader
Breaking News
Breaking News
Foto

कसई-दोडामार्ग नगरपंचायततर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत कापडी पिशवी वाटप उपक्रम

साटेली (प्रतिनिधी) - कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील शहर स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने नगरपंचायतमार्फत केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची घरप‌ट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे भरलेली असून कोणतीही थकबाकी शिल्लक नसलेल्या प्रत्येक रहिवासी असेसमेंट धारकास एक कापडी पिशवी मोफत देण्यात येणार आहे. संबंधित घरपट्टीधारकांनी नगरपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक करभरणा पूर्ण करून कापडी पिशवी स्वीकारावी, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कापडी पिशवी केवळ रहिवासी धारकांसाठीच देण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नगरपंचायतीचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असून ओला व सुका कचरा वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, कचरा रस्त्यावर न टाकणे, एकवेळ वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळणे या बाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगरपंचायतमार्फत प्लास्टिकमुक्त शहर, स्वच्छ बाजारपेठ, घनकचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम, जनजागृती फेऱ्या, शालेय स्वच्छता कार्यक्रम अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांना नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहकार्य करावे विशेषतः बाजारपेठ, आठवडी बाजार, सार्वजनिक कार्यक्रम व दैनंदिन खरेदीसाठी कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

या कापडी पिशवी वाटप उपक्रमाचा शुभारंभ नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, सर्व नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की वेळेत घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करून नगरपंचायतीच्या विकासकामांना हातभार लावावा तसेच स्वच्छता व पर्यावरण रक्षणाच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन नगर पंचायातीच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg