loader
Breaking News
Breaking News
Foto

हत्तीरोगाची धास्ती; नेमळे गावात झारखंडचे ४ कामगार 'पॉझिटिव्ह' संशयित

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावात हत्तीरोग सदृश्य ४ संशयित रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. हे चारही रुग्ण झारखंड येथून वीटभट्टी कामासाठी आलेल्या मजुरांपैकी असून, या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा तातडीने 'ॲक्शन मोड'वर आली आहे. ​शासनाच्या आदेशानुसार परराज्यातून आलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नेमळे गावात वीटभट्टीवर काम करण्यासाठी आलेल्या २८ कामगारांची रक्त तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले असता, २८ पैकी ४ कामगारांमध्ये हत्तीरोगाची लक्षणे दिसून आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संशयित रुग्ण आढळताच आरोग्य विभागाने सतर्कता दाखवत खालील पावले उचलली आहेत. बाधित संशयित रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. ​पुनर्तपासणी: या रुग्णांची पुन्हा एकदा सखोल चाचणी केली जाणार आहे. जर या चाचणीत अहवाल 'पॉझिटिव्ह' आले, तर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

हत्तीरोग हा डासांमार्फत पसरणारा आजार असल्याने नेमळे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने गावात तातडीने फवारणी मोहीम राबवली आहे.​ एकाच वेळी चार संशयित रुग्ण आढळल्याने नेमळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. परराज्यातून येणाऱ्या मजुरांची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही सर्व गावांना देण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg