loader
Breaking News
Breaking News
Foto

कलाकारांसाठी तरी कलाकारांनी एकत्र येणे ही काळाची गरज - कोकणरत्न बुवा संतोष शिर्सेकर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी या मंडळाची वार्षिक सभा नुकतीच देवर्षी नगर सभागृह रत्नागिरी येथे मा अध्यक्ष साईनाथ नागवेकर, यांच्या अध्यक्षतेखाली मा कोकणरत्न सतोष शिर्सेकर, शरद गोळपकर, संजय सुर्वे बुवा महिला मंडळ अध्यक्षा प्रेरणाताई विलणकर, सचिव समिक्षा वालम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधरण सभा सपन्न झाली. यावेळी प्रथम ज्ञात अज्ञात दिवंगताना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित सर्वाचे स्वागत करुन सभेला सुरुवात करण्यात आली. इतिवृत वाचन, वार्षिक जमा खर्च, लेखापरिक्षण रिपोर्ट, तसेच पुढिल कार्यक्रम व खर्चाचे नियोजन करण्यासाठी परवानगी घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षी मंडळाने महिलाना नमन कलेच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करुन दिले ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या बद्ल सर्वानीच महिलांचे कौतुक केले आहेच पण हे शिवधनुष्य ज्यां महिलांनी उचलले आहे त्यां सर्व महिलांना सलाम करावाच लागेल आज ही संस्था सर्व कलाकारांना व्यासपीठ द्यायला तयार आहे. आर्थिक दृष्ट्याही मदतही करत आहे. परतु कलाकारांना न्याय हक्क मिळवण्यासाठी व हक्काच्या या व्यासपीठावर काम करण्यासाठी कलाकारांनीच कलाकारांसाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे आणि हे कलाकारांनीच जाणले पाहिजे व त्यासाठी कलाकारांनी एकत्र यायला पाहिजे ही काळाची गरज आहे. संस्था उत्तम प्रकारे काम करत आहेच आणि ध्येय ही मोठे आहे हे पाहूनच समाधान वाटले, असे गौरवोद्गगार माऊली सतोष शिर्सेकर यांनी काढले.

टाइम्स स्पेशल

या वेळी प्रविण सावंतदेसाई, संजय सुर्वेबुवा,यानी मनोगते व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात बोलताना आपण जर एकत्र येवून काम केले तर कलाकारांना आणखी उर्जा येईल असे उद्गगार साईनाथ नागवेकर यांनी काढले. या वेळी जेष्ठ भजनी कलाकार मिलींद आरेकरबुवा, संजय मेस्री बुवा प्रसाद राणे, सागर मायगडे, दादा वाडेकर, राकेश बेर्डे, निवास शिरगांवकर, मानसी साळवी, शीतल सकपाळ, सर्वता चव्हाण, रिमा देसाई, विनया काळप, रेश्मा शिंदे, वेदा शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वाचे स्वागत करण्यात आले. आभार व सभेचे सुत्रसंचलन सचिव वासुदेव वाघे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg