loader
Breaking News
Breaking News
Foto

आम.किरण सामंत यांच्या वाढदिवशी नगरसेवक रफिक नेवरेकर यांनी रुग्णांना केले फळवाटप

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक रफिक उर्फ गुल्ल्‌या नेवरेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत लांजा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगरसेवक रफिक नेवरेकर यांनी प्रथम लांजा शहरातील हजरत सय्यद चॉंदशहा बुखारी दरगाह येथे भेट देत फुलांची चादर अर्पण केली. आमदार किरण सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी त्यांनी प्रार्थना केली. यानंतर रफिक नेवरेकर यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात भेट देत तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांच्या लवकर आरोग्य प्राप्तीसाठी शुभेच्छा देत सर्व रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, यावेळी सचिन डोंगरकर, इकबाल खतीब, नाजीम नेवरेकर, रियाज नेवरेकर, राजू मुजावर, हाफिज ठाकूर, मासुम मापारी, आजीम मापारी, रवूफ मापारी, साद मापारी, वसीम मुजावर, वसीम खतीब, आवेज नेवरेकर आणि नदीम मापारी आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg