ठाणे (प्रतिनिधी) : बिग बाॅस मराठी या मालिकेतून प्रसिद्धीत असलेल्या बिग बॉस 3 चा विजेता असलेला जय दुधाने याला ठाणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. चार महिन्यांपूर्वी ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ४ कोटी ६१ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. ठाण्यातील त्याचे दुकाने बँकेकडे तारण असतानाही ते विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. "माझ्यावर जो आरोप करण्यात आलाय, ती अफवा कोणी पसरवली माहीत नाही. माझ्यावर लोक उलटले आहेत. लवकरच सत्य काय हे तपासानंतर बाहेर येईल. मी माझा चेहरा लपवणार नाही, कारण हे सगळं प्रकरणच खोटं आहे. माझ्यात हिंमत आहे, मी कोणत्याही प्रकारे गुन्हा केलेला नाही, त्यामुळेच मी या प्रसंगाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवतो," अशी प्रतिक्रिया जय दुधानेने दिलीय.
"माझ्यावर दाखल असलेला गुन्हा हा खोटा आहे. यात माझे आजी आजोबांना देखील आरोपी करण्यात आलेले आहे. माझ्या नावाचे अटक वॉरंट आहे हे मला माहीत नाही. लग्नानंतर मी पत्नीसोबत हानीमुनला परदेशात जात असताना पोलिसांनी मला ताब्यात घेतलं. त्यांनी मला देश सोडता येणार नाही असंही जय दुधानेने सांगितलं. त्यामुळं मी पोलिसांना सहकार्य करत असून मी आलेल्या प्रसंगाचा सामना करणार आहे." असे बिग बॉस 3 चा विजेता जय दुधाने याने सांगितले. जय दुधाने आणि त्याच्या कुटुंबीयांवर दाखल असलेला हा गुन्हा काही दिवसांपूर्वी वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जय दुधाने हा पोलिसांना मिळाला नव्हता. जय दुधानेला जय दुधाने हा जीम व्यावसायिक असून, तो फिटनेस ट्रेनर खेळाडू आणि मॉडेलिंगचे देखील काम करतो. जय दुधाने याच्या कुटुंबियांचे काही गाळे पोखरणरोड क्रमांक एक भागात आहेत. हे गाळे एका खासगी बँकेकडे तारण आहेत. असे असतानाही त्यांनी हे गाळे त्याच भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला विक्री करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या गाळ्यांच्या मोबदल्यात जय दुधाने आणि त्यांच्या कुटुंबियांनी तक्रारदार यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ४ कोटी ६१ लाख रुपये घेतले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक भागात जय दुधाने हा त्याच्या कुटुंबियासोबत वास्तव्यास आहे. जय दुधाने हा एम टीव्ही स्प्लिट्सविला १३ चा विजेता होता. तसेच मराठी बिग बाॅस या मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा उप विजेता होता. मराठी बिग बाॅसमध्ये त्याला मोठ्याप्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्याचे इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर फाॅलोवर्स देखील वाढले होते. त्याचा शोध घेतल्यानंतर आज त्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाल्यावर मुंबई विमानतळावरून ठाणे वर्तकनगर पोलिसांनी जय दुधाने याला अटक केली अटक केली. मालमत्ते संदर्भातील हा गुन्हा असून, यामध्ये खोटी कागदपत्रं तयार करणे आणि फसवणूक करणे या कलमांचा समावेश आहे. अधिक तपास करून पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलीय.









































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.