loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब आँफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून माणगांव येथे २०० दिव्यांगांसाठी होणार आधुनिक माँड्यूलर पाय मोफत मोजमाप शिबिर

वावेदिवाळी इंदापूर - (गौतम जाधव) -रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून आयोजित भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र, पुणे तर्फे २०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय मोफत बसविण्यासाठी मोजमाप शिबिर माणगाव येथे रविवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी वनवासी आश्रम शाळा, उतेखोल येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. दिव्यांगाना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे. भारतातील १३ दिव्यांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या २५ वर्षापासून अखंड कार्यरत आहे. भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबीर घेणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे तर्फे दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसविण्यात येतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच सदर दिव्यांग केंद्रातर्फे एपिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम केला आहे त्याची नोद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. यांच्या निधीतून हे मोफत दिव्यांग शिबिर आयोजित केले आहे. रोटरी क्लब ही अनेक सामाजिक कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था असून रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून हे मोफत दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रायगड जिल्हा कार्यवाह प्रशांत ढेपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विश्वस्त व दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉडयूलर पायाविषयी माहिती दिली. माहिती देताना ते म्हणाले आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची कमर्शियल किमंत रु. ५० हजारापेक्षा जास्त असून असे कृत्रिम पाय ह्या शिबिरात २०० दिव्यांगांना मोफत देणार आहोत.

टाइम्स स्पेशल

परंपरागत जयपूर फूट पेक्षा हे आधुनिक मॉड्यू कृत्रिम पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसविल्यानंतर दिव्यांन व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे व शेती कामे इ. प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात त्याबाबत तज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शनही केले जाते. माणगाव परिसरातील आणि रायगड जिल्हा व जवळपासच्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी शिबिरासाठी फोन द्वारे पूर्व नोंदणी करावी. यासाठी विनोद ९८८११३८०५२, चंद्रशेखर ९८२३०२४२३२ यांना नोंदणी साठी संपर्क करावयाचा आहे. दिव्यांग व सोबती यांचेसाठी मोफत भोजन, चहा इ. सोय आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे प्रोजेक्ट कन्व्हेनर आर्या पळसुले यांनी शेवटी आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg