loader
Breaking News
Breaking News
Foto

उमेश नेरुरकर यांना आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार जाहीर

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कारातील महत्वाच्या आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्काराची घोषणा महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी केली असू यात सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 'आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार' मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना जाहीर झाला आहे. व्यापारी महासंघाच्यावतीने दरवर्षी कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, कै. माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार, सेवाव्रती श्री. बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा-उद्यमी पुरस्कार, कै. बी. एस. तथा भाईसाहेब भोगले स्मृती ग्रामीण नवउद्यमी पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसह इतरही पुरस्कारांची घोषणा टप्याटप्याने करण्यात येणार असल्याचे नितीन वाळके यांनी स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर हे मागील २५ वर्षांपासून मालवणचे अध्यक्षपद यशस्वीपणे एकखांबी सांभाळत आहेत. २०००, २००८, २०१६, २०२४ या सलग चार व्यापारी मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे. कुशल संघटक व सर्वांना सोबत घेऊन काम करून घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. संपुर्ण जिल्ह्यात फक्त मालवणमध्येच नव - युवा महिला व्यापाऱ्यांना व्यापारी संघटनेच्या कामात सहभागी करून घेण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. वर्षभर नियमितपणे व्यापारी वर्षा अभ्यास सहल, व्यापारी एकता वनभोजन, युवा व्यापाऱ्यांची एकदिवसीय एकता सहल, नारळी पौर्णिमा उत्सव, दीपावली उत्सव, विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

व्यापारी संघातर्फे नियमितपणे सभासद नोंदणी व बैठकांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक एकता मेळाव्यात मालवणच्या व्यापाऱ्यांची विक्रमी उपस्थिती ठेवण्यात महत्वाचे योगदान नेरूरकर हे देत असतात. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा व्यापारी महासंघातर्फे त्यांना आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार जाहीर केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg