loader
Breaking News
Breaking News
Foto

फिरती प्रयोग शाळेमार्फत "त्या दहा" विद्यार्थ्यांना दापोलीत प्रयोग दिग्दर्शन

खेड - दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून केंद्रस्तर ते तालुकास्तरीय चाळणी परीक्षेतून इस्त्रो- नासा अभ्यास दौरा जिल्हास्तर चाळणी परीक्षेसाठी दापोलीतून निवड झालेल्या "त्या दहा " विद्यार्थ्यांना प्रयोग प्रात्यक्षिकाची गरज ओळखून सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्यावतीने जालगावचे अजिंक्य तलाठी यांचे स्मरणार्थ सुधीर तलाठी यांनी दोन दिवस प्रयोग प्रात्यक्षिकाचे आयोजन केले आहे. ट्रस्टचे मार्गदर्शक शिक्षक दिनेश नाटेकर सदर विद्यार्थ्यांना प्रयोग दिग्दर्शन करीत आहे. कोकण प्रांत ट्रस्टच्या वतीने तालुक्यातील असंख्य शाळांना दरमहा शाळेत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिकदृष्टिकोन वृध्दिंगत होण्यास मदत होत असल्याचे ६ व ७ जानेवारी दोन दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी दापोलीचे गटशिक्षणाधिकारी, रामचंद्र सांगडे यांनी मत व्यक्त केले. तर जालगाव येथे आपल्या केंद्रशाळेत दोन दिवस सदर सदर प्रयोग प्रात्यक्षिक कार्यशाळा अयोजीत केल्याबद्दल दापोली तालुका माजी उपसभापती मनोज भांबीड यांनी समाधान व्यक्त करीत जिल्हास्तर चाळणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

यावेळी जालगाव ग्रा.पं.चे माजी सदस्य, विलास जालगावकर, आयोजक सुधीर तलाठी, शिरिष देसाई, शाळा व्यवस्थापन समीती अद्यक्ष नांदीस्कर, प्रयोगशाळा मार्गदर्शक शिक्षक दिनेश नाटेकर, त्या दहा विद्यार्थीनींचे मार्गदर्शक शिक्षक, पालक, तसेच शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg