loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली शाळा नं. १च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी राजेश विचारे व कुटुंबीयांकडून १ लाख रुपयांची देणगी

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली जिल्हा परिषद शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी वरवेली मराठवाडीतील रहिवाशी राजेश शांताराम विचारे, श्रीमती शुभांगी शांताराम विचारे, कु. साहिल गणेश राणे विचारे, श्रीमती सुजाता शांताराम विचारे यांच्या वतीने कै. पांडुरंगराव भगवंतराव विचारे व कै.शांतारामभाई पांडुरंग विचारे यांच्या स्मरणार्थ रुपये १ लाख रुपयांची देणगी शाळेला देण्यात आली. यावेळी वरवेली शाळा व शाळा व्यवस्थापन समिती तसेच शतक महोत्सव समिती यांच्यावतीने विचारे कुटुंबीयांचा शाळेच्या रंगमंचावर सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना देणगीदार राजेश विचारे यांनी सांगितले की, माझे आजोबा पांडुरंगबाबा विचारे यांनी सन १९२५ साली आपल्या राहत्या घरात मराठी शाळा सुरू करून विना मोबदला ४० वर्षे विना मोबदला विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले, या मौल्यवान कामगिरीबरोबर त्यांनी वरवेली गावच्या पहिल्या सरपंच पदाची धुरा यशस्वीरिता सांभाळली. तसेच वरवेली गावची ग्रामदेवता हसलाई देवीचे पहिले मानकरी म्हणून अखंड सेवा केली. त्यानंतर तेच काम त्यांचा मुलगा म्हणजेच माझे वडील शांतारामभाई विचारे यांनी धुरा सांभाळली. या दोन महान व्यक्तींच्या स्मरणार्थ या शाळेला रूपये १ लाख देणगी देऊन त्यांचे समाजकार्य व शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या योगदानाचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. यापुढेही या शाळेसाठी तसेच गावासाठी जास्तीत जास्त सहकार्य आमच्या कुटुंबाच्यावतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले.

टाइम्स स्पेशल

यावेळी व्यासपीठावर देणगीदार राजेश विचारे, निवृत्त शिक्षिका शुभांगी विचारे, नासा गोल्ड मेडलिस्ट साहिल राणे विचारे, सुजाता विचारे यांच्यासह सरपंच नारायण आगरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल रांजाणे, उपाध्यक्षा धनश्री चांदोरकर, अंगणवाडी पालक समिती अध्यक्ष मनस्वी किर्वे, संतोष रांजाणे, बाळकृष्ण पवार, वैभव पवार, जितेंद्र विचारे, रविकांत विचारे, प्रसाद विचारे, शशिकांत जाधव, नामदेव रावणंग, अशोक रावणंग, संतोष किर्वे, अविनाश रांजाणे, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड, मुख्याध्यापक समीर पावसकर, शिक्षिका अर्चना वाकडे, अंगणवाडी सेविका सीमा किर्वे, मदतनीस अस्मिता पवार, आशा सेविका दिव्या किर्वे यांच्यासह सर्व समितीचे सदस्य, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg