loader
Breaking News
Breaking News
Foto

​'सावंतवाडी ही माझी कर्मभूमी, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप

सावंतवाडी (प्रतिनिधी) - "माझी जन्मभूमी वेंगुर्ला असली तरी, खऱ्या अर्थाने सावंतवाडी हीच माझी कर्मभूमी आहे. अनेक वर्षे या शहरात राहिल्यामुळे येथील गल्ली न् गल्लीचा मला अभ्यास आहे. त्यामुळे वेंगुर्ल्या इतकेच प्रेम माझे सावंतवाडीवर असून, विकास प्रक्रियेत आम्ही सोबत राहून हे ऋणानुबंध अधिक दृढ करू," असे आश्वासन वेंगुर्ल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी येथे दिले. ​येथील विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेमार्फत शनिवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या वतीने राजन गिरप यांच्यासह सावंतवाडी नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले, नगरसेवक अजय गोंधवळे, नीलम नाईक, विना जाधव आणि ॲड. अनिल निरवडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ममता मोहन जाधव होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सत्काराला उत्तर देताना राजन गिरप भावूक झाले. ते म्हणाले की, "वेंगुर्ल्यात नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर अद्याप कोणत्याही सोसायटीने असा सत्कार केला नव्हता. विवेकानंद सोसायटीने दाखवलेले हे प्रेम माझ्या कायम स्मरणात राहील. विकासाच्या कामात सावंतवाडी नगरपालिकेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही मी देतो." ​कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले. "राजन गिरप हे आमच्या सोसायटीचे सदस्य असून ते नगराध्यक्ष झाल्याचा आम्हा सर्व सदस्यांना सार्थ अभिमान आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

टाइम्स स्पेशल

राजन गिरप यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा ममता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. ​नीलम नाईक यांचा सत्कार सचिन मांजरेकर यांच्या हस्ते झाला. ​अजय गोंधवळे यांचा सत्कार चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. ​विलास जाधव यांचा सत्कार नंदकिशोर कोंडये यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात ममता जाधव यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींचे अभिनंदन केले. नगरपालिकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी सावंतवाडी शहराच्या प्रवेशद्वारावर होणाऱ्या दुर्गंधीकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg