loader
Breaking News
Breaking News
Foto

​माजगाव म्हालटकरवाडा धालोत्सवाची उत्साहात सांगता

सावंतवाडी (प्रतिनिधी) - लोककला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या माजगाव-म्हालटकरवाडा येथील पारंपरिक धालोत्सवाची उत्साहात सांगता झाली. 'पती-पत्नी' वेशभूषेतील स्त्रिया आणि त्यांची निघालेली अनोखी वरात हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा म्हालटकरवाडा येथील ग्रामस्थांनी आजही तितक्याच श्रद्धेने जोपासली आहे. ​सात रात्री चालणाऱ्या या धालोत्सवाची शेवटची रात्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. परंपरेनुसार, दोन महिला पती आणि पत्नीची वेशभूषा करतात. या 'वराची' वाजत-गाजत वरात वाड्यातून देवघराकडे येते. तुळशीपाशी 'दानोषाला' बसल्यानंतर पारंपरिक ओव्या गायल्या जातात. "रुखवात कर्तलेगे सुंदरी, झेंडे बसले बरोबरी..." अशा ओव्यांच्या सुरात हा सोहळा रंगतो. त्यानंतर मांडावर या पती-पत्नीचे प्रतिकात्मक लग्न लावले जाते. यावेळी उपस्थित महिला लोकगीते सादर करतात, तर देवीकडून सर्वांना तीर्थप्रसाद दिला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रात्रीच्या विविध कार्यक्रमानंतर पहाटे एक महिला 'पिंगळी'चे रूप धारण करते. ही पिंगळी इतर महिलांसह वाड्यातील प्रत्येक घरी जाऊन देणगी जमा करते आणि ती मांडावर आणून अर्पण केली जाते. गुरुवारी सकाळी वाड्यातील सर्व मंडळी एकत्र जमली. यावेळी देवीची ओटी भरणे आणि नवस बोलण्याचे विधी पार पडले. ​या उत्सवात अपत्यप्राप्तीसाठी केला जाणारा विधी विशेष मानला जातो. ज्या महिलेला मूल नाही, ती महिला मांडावर शेणाच्या तुळशीत हळद-दुधाचे मिश्रण ओतते. यावेळी तिला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या विधीनंतर संबंधित महिलेची ओटी भरली जाते आणि तिला मिळणारे खोबरे केवळ त्या पती-पत्नी वेशभूषा केलेल्या व्यक्तींनीच खायचे असते, अशी कडक अट पाळली जाते. ​अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या धालोत्सवामुळे माजगाव परिसरातील सांस्कृतिक वातावरण चैतन्यमय झाले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg