loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळे'चे उत्साहात आयोजन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - मराठी भाषेची समृद्धी आणि ज्ञानाचे संकलन करणाऱ्या 'मराठी विश्वकोशा'च्या निर्मिती प्रक्रियेत शिक्षकांचा सहभाग वाढवण्यासाठी सावंतवाडीत एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (मुंबई) आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही 'विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळा' राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या कार्यक्रमाला नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी विशेष उपस्थिती लावून मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सदस्या वृंदा कांबळी, डॉ. शरयू आसोलकर, वामन पंडित, महादेव देसाई, भरत गावडे, विठ्ठल कदम आणि संपादकीय सहाय्यक वर्षा देवरुखकर उपस्थित होत्या. या तज्ज्ञांनी उपस्थित शिक्षकांना विश्वकोशासाठी नोंदी कशा कराव्यात, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी भाषा मंडळाचे सदस्य भरत गावडे यांनी सावंतवाडीमध्ये 'मराठी भाषा मंच' स्थापन करण्याबाबतचे सूतोवाच केले. मराठी भाषा जोपासणे हे केवळ शासनाचे नव्हे, तर प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रतिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन म. ल. देसाई यांनी आपल्या भाषणात केले.

टाईम्स स्पेशल

​या कार्यशाळेला सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबद्दल समाधान व्यक्त करत, अशा उपक्रमांना सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक सुधीर आरीवडेकर, प्रतीक बांदेकर यांनी भेट दिली. तर विजय गावडे (अध्यक्ष, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडी), संप्रवी कशाळीकर (मुख्याध्यापिका, आरपीडी प्रशाला), विठ्ठल कदम (सदस्य, मराठी भाषा मंडळ) उपस्थित होते. ​सूत्रसंचालन मनोहर परब व ​आभार विजय गावडे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg