loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप पटकविल्याबद्दल कोंड्ये जि.प.शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांची जेसीबीतून मिरवणुक

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील कोंडये जिल्हा परिषद शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांची चक्क जेसीबीत बसवून गावातून भव्य अशी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कोंडये शाळा नं. १च्या खेळाडूंनी खो-खो लहान गट मुलांच्या संघाने जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप पटकविल्याबद्दल हा आनंद साजरा करण्यात आला. जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा चिपळूण डेरवण येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत कोंडये जिल्हा परिषद शाळा नं. १ च्या खो-खो लहान गट मुलांच्या संघाने दैदीप्यमान कामगिरी बजाविताना विजेतेपद पटकाविले. जिल्हा चॅम्पियनशिप पटकाविणार्‍या या सर्व खेळाडूंचे कोंडये गावच्या सीमेवर गुरुवारी रात्री मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, डिजेचा ताल आणि त्यांच्या स्वागतासाठी जमलेले शेकडो कोंडये ग्रामस्थ आणि पालक यांच्या उपस्थितीत या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांची जेसीबीत बसवून मोटारसायकल रॅली काढून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेच्या या संघाचा कर्णधार प्रेम प्रदीप चंदुरकर याच्यासह पार्थ देवेंद्र झिमण, अर्णव रामचंद्र माईल, अर्णव प्रवीण शिंदे, सम्यक संतोष कांबळे, कौशल दिलीप नाटेकर, श्रवण महादेव गुरव आणि वेदांत विकास रांबाडे यांचा समावेश आहे. यावेळी मागील दोन महिन्यांपासून खो - खो खेळासाठी विशेष मेहनत घेणारा क्रीडा प्रशिक्षक कु. चेतन सुनील नाटेकर या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, आपला संघ जिंकून आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी कोंडये गावचे गावप्रमुख व सर्व वाडीप्रमुख, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पोलीस पाटील, कोंडये ग्रामसेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सर्व पालक, सर्व ग्रामस्थ, सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg