loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुडमध्ये पद्मदुर्ग जागर सोहळ्याची जय्यत तयारी सुरु

मुरुड (राजीव नेवासेकर) - मुरुड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था, कोकण कडा मित्र मंडळ रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थांच्यावतीने पद्मदुर्ग सोहळा रविवार ११ जानेवारी २०२६ रोजी पद्मदुर्ग किल्ल्‌यावर राज्याचे मत्स्योद्योग, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमावेळी खासदार सुनील तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री-भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी, तहसीलदार आदेश डफल, बंदर निरीक्षक-प्रमोद राऊळ, मुरूड जंजिरा नगरपरिषद मुख्याधिकारी-सचिन बच्छाव, पुरातत्व विभागाचे अधिकारी-बजरंग येलेकर, पोरहित-प्रकाश स्वामी जंगम, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, मुरूड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकुर, राहुल कासार, कोकण कड़ा मित्र मंडळ रायगड-शेखर मामा फरमन, उपाध्यक्ष-संकेत वडके, सुरेश पवार, अनिकेत कदम, प्रकाश दाभेकर आदींसह शिवप्रेमी उपस्थित असणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुरूड पद्मदुर्ग जागर व गडभ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकुर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, स्वाभीमानाचा पद्मदुर्ग जागर एक दिवस इतिहासाचा पद्मदुर्ग जागर सोहळा गेली १७ वर्ष पद्मदुर्ग किल्ल्‌यात करत आहोत. जेणेकरून या कार्यक्रमातून शासनाला जाग येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्लाचे संवर्धन व जतन होईल हाच मुख्य हेतू हा कार्यक्रम घेण्याचा आहे. तरी शासनाने जागे होऊन पद्मदुर्ग किल्लयाकडे लक्ष द्यावे. येणार्‍या ११ जानेवारी २०२६ रोजी पद्मदुर्ग जागर सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी ६ वाजता राधाकृष्ण मंदिर ते जेट्टी पर्यत पालखी प्रस्थान, सकाळी ०७ ते ०८ वा. गड स्वच्छता, सकाळी ०८ ते ०९ वा. गड सजावट, सकाळी ०९.३० वा. : गड पूजन, सकाळी १०.०० वा., गडदेवता श्री कोटेश्वरी माता पूजन सकाळी १०.३० वा., छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रतिमा अभिषेक व पूजन सकाळी ११.०० वाजता, व्याख्यान, मर्दानी खेळ, गडकोट शिवपालखी सोहळा, दुपारी १२.३० वा. : श्री कोटेश्वरी माता दर्शन व आरती दुपारी १.०० वा. : महाप्रसाद दुपारी २.०० वा. गड स्वच्छता करणार आहोत. तरी शिवप्रेमींनी डोंगरी येथील खोरा बंदराजवळ येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शिवप्रेमी यांना करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg