loader
Breaking News
Breaking News
Foto

आठवडाबाजारात ९३ हजारांची ब्राऊन शुगर जप्त

रत्नागिरी (वार्ताहर): शहरातील आठवडा बाजार गाडी पार्किंग येथे गाडी विकण्याच्या बहाण्याने ब्राऊन शुगर हेरॉईन विक्री करणार्‍या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कडून ९३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अजय उर्फ पप्पू प्रभाकर नाचणकर (वय ४६, तेली आळी, रत्नागिरी), मुनाफ नुरुद्दीन वस्ता (रा. राजिवडा, काद्री मस्जिद जवळ-रत्नागिरी) अरसलान सिकंदर फणसोपकर (वय २५, रा. राजिवडा बांध-रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. २) रात्री ७.४५ च्या सुमारास आठवडा बाजार गाडी पार्किंग येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिता ३ ग्रॅम वजनाचा बाऊन हेरॉइन सदृश्य अंमली पदार्थ दुचाकीसह विक्री करण्याच्या उद्देशाने सापडले. संशयितांकडून पोलिसांनी ७५ हजाराची दुचाकी (क्र. एमएच-०८ एव्ही १८२३) व १८ हजार ८०० रुपयांचा ३ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन अंमली पदार्थ असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांची मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg