loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोग्य विभागात नोकरीचे अमिष दाखवून रिक्षा मॅकेनिकची ११.३९ लाखांची फसवणूक

रत्नागिरी (वार्ताहर): तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मॅकेनिकला आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची तीन संशयितांनी फसवणूक केली. तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यामध्ये एका अनोळखी महिलेचा सामावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर म्हस्के (पुर्ण नाव माहित नाही) जनता सहकारी बँक क्लार्क नगर ठाणे, येथील बँक खातेधारक रोहीत प्रकाश म्हसकर व अन्य अनोळखी महिला असे संशयित आहेत. ही घटना २७ जानेवारी २०२२ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मोबाईलद्वारे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी उमेश शांताराम धनावडे (वय ३३, रा. रिक्षा मॅकेनिक, रा. करबुडे-मासेबाव, रत्नागिरी) संशयित समीर म्हस्के याने त्यांचा भाऊ तुषार शांताराम धनावडे तसेच अन्य मित्र अजय विजय गोवळकर यांना आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावतो, त्यासाठी पोस भरावयाचे लागतील असे सांगतिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वर्तक नगर-ठाणे या बँकेतील रोहित प्रकाश म्हसकर या नावाच्या खात्यावर २७ जानेवारी २०२२ ला ते १ मे २०२४ या कालावधीत एकूण ६ लाख ८६ हजार ५६१ रुपये तसेच वाडीतील मित्र तेजश वंसत धनावडे यांच्या मोबाईलवरुन संशयित रोहित म्हसकर यांच्या अभ्युद्या को. ऑफ.बँक लिमिटेड या बँकेच्या खात्यवार ३० मार्च २०२२ ते १९ मे २०२२ या कालावधीत ९३ हजार ९५० रुपयांची तर १३ मे २०२४ ते १० जून २०२४ या कालवधीत वेळोवेळी १ लाख ८७ हजार रुपये बँक ट्रान्स्फर केले.

टाइम्स स्पेशल

तसेच मोबाईलवरुन अनोळखी महिलेने फोन करुन रोहत म्हसकर यांच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितल्याने फिर्यादी उमेश धनावडे १० हजार खात्यावर बँक ट्रान्सफर केले. त्यानंतर पुन्हा संशयित समीर म्हस्के हा वारंवार फोन करुन फिर्यादी यांना पैसे पाठवण्यास सांगितल्याने फिर्यादी उमेश यांनी १७ ऑक्टोबर २०२५ ला समिर म्हस्के यांचे मोबाईलवर १७ ते २७ ऑक्टोबर २०२५ या मुदतीत गुगल पे द्वारे १ लाख ६२ हजार रुपये ट्रान्स्फर केले. असे एकूण ११ लाख ३९ हजार ५११ रुपये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी यांनी संशयित समीर म्हस्के यांच्याकडे विश्वासाने ट्रान्सफर केलेले पैसे परत मागितले असता संशयिताने पुन्हा केलास तर बघून घेईन अशी धमकी दिली. या प्रकरणी उमेश धनावडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg