loader
Breaking News
Breaking News
Foto

प. पू. भालचंद्र महाराजाच्या जन्मोत्सवानिमित्त १२२ रक्तदात्यांचे रक्तदान

कणकवली (प्रतिनिधी) - प. पू. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२२ व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे महाराजांच्या जन्मवर्षाशी साधर्म्य साधत तब्बल १२२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजप्रती आपले योगदान दिले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मानवतेच्या भावनेतून बाबांच्या चरणी ही सेवा म्हणून रक्तदान करत भविकांनी या शिबिरातून संदेश दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संस्थानचे खजिनदार दादा नार्वेकर, सेक्रेटरी निवृत्ती धडाम, विश्वस्त प्रसाद अंधारी, गजानन उपरकर, नागेश मुसळे, संस्थानचे व्यवस्थापक विजय केळूसकर, प्रा. दिवाकर मुरकर, डॉ. विद्याधर तायशेटे, सभासद उमेश वाळके, सोमनाथ खेडेकर, अँड. प्रवीण पारकर, चेतन अंधारी, विजय राणे, श्रीरंग पारगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg