loader
Breaking News
Breaking News
Foto

शाहीर शाहिद खेरटकर यांचा सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मान

आबलोली (संदेश कदम) - सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक अजरामर नाव, रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी गावचे सुपुत्र, जनसामान्यांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांची प्रतिमा आजही जनमानसात रुजलेली आहे, ते स्वर्गीय अनंतरावजी बैकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अनंत व्याख्यानमाला अंतर्गत समाजातील प्रबोधनात्मक कार्य करणार्‍या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शाहीर शाहिद खेरटकर यांचे समाजातील विविध क्षेत्रातील योगदान, प्रामुख्याने त्यांनी लोककला क्षेत्रात निर्माण केलेले अस्तित्व आणि त्याद्वारे करत असलेले प्रबोधनात्मक कार्य याची दखल घेऊन त्यांना सदरचा सन्मान प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनंतरावजी बैकर यांचा जीवनप्रवास हा प्रचंड सुधारणावादी तत्वांवर आधारित होता.लोकनेते श्यामराव पेजे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील धार्मिक,जातीय उतरंडीला छेद देत त्यांनी समतावादी मूल्यांचा पुरस्कार केला.वेठबिगारी, कुळवहिवाट,यासारख्या समस्यांवर प्रभावी कार्य केले.ज्या काळात बहुजन समाजावर अंधश्रद्धेच्या पगडा होता त्या काळात सामाजिक विकासाला अडथळा ठरणाऱ्या अंधश्रद्धेवर प्रहार करत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे प्रयत्न केले.अनेक मोहिमांवर त्यांनी आपली वैचारिक प्रगल्भता सिद्ध केली.सलग २० वर्षे सत्कोंडी गावचे सरपंच राहून गावच्या विकासाला गती दिली.अंतिम श्वासापर्यंत त्याने केवळ सामाजिक हीत साधले.म्हणूनच त्यांच्या पश्चात त्यांचे अनुयायी आणि परिवारातील सदस्य ,त्यांचे सुपुत्र नितीन अनंत बैकर व संजय बैकर मिळून त्यांचा स्मृतिदिन हा प्रेरणादिन म्हणून साजरा करतात.

टाइम्स स्पेशल

अनंतरावजी बैकर यांचा वैचारिक वारसा पुढे प्रवाहित व्हावा, या ध्येयातून तत्सम कार्य करणार्‍या समाजातील प्रभावशाली व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. केवळ सन्मान सोहळा नव्हे तर अनंत व्याख्यानमाला देखील आयोजित करण्यात येते. यावेळी शाहीर शाहिद खेरटकर यांच्यासहित शिक्षण विस्तार अधिकारी, (रत्नागिरी) सुधाकर मुरकुटे यांना देखील सदरचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने शाहीर शाहिद खेरटकर यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते. शाहिरांनी आपल्या ओघवत्या शैलीने व वैचारिक मेजवानीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी शाहीर शाहिद खेरटकर यांच्यासमवेत संविधान सन्मान समितीचे सदस्य माजी सैनिक संतोष मोहिते, सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते, हवालदार चंद्रकांत कदम, सुधीर गमरे हे देखील उपस्थित होते. शाहीर शाहिद खेरटकर यांच्या कार्याचा आजवर विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहेच याशिवाय आणखी एका बहुमूल्य सन्मानाची भर पडल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. शाहीर शाहिद खेरटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg