loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण नगरपालिकेत उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांचा गट स्थापन

मालवण : (प्रतिनिधी) - मालवण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडून आलेल्या चार नगरसेवकांनी एकत्र येत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण नगरपरिषद गट' स्थापन केला आहे. या गटाच्या गटप्रमुखपदी महेंद्र सुदाम म्हाडगुत यांची एकमताने निवड केली आहे. याबाबतचे पत्र नगरविकास विभागाला सादर करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत बोलताना नगरसेवक मंदार ओरसकर म्हणाले, मालवण नगरपालिका निवडणुकीत आम्ही उबाठा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणूनच निवडणूक लढलो व निवडून आलो. त्यामुळे मालवण नगरपालिकेत आम्ही गट स्थापन करून त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण नगरपालिका गट असे पक्षाचेच नाव दिले आहे. या गटाच्या गटप्रमुख पदी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांची निवड केली आहे, महेंद्र म्हाडगुत हे निष्ठावान शिवसैनिक असून अनुभवी देखील आहेत म्हणूनच त्यांची गटप्रमुख पदी निवड केली आहे. मालवण शहराच्या विकासासाठी आमचा गट नगरपालिकेत नेहमीच आग्रही भूमिका मांडेल, असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

गटप्रमुखपदी महेंद्र म्हाडगुत यांची निवड

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg