loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ७ रोजी मालवण शहर मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमधील पाककौशल्याला व्यासपीठ मिळावे आणि पौष्टिक आहाराविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही पाककला स्पर्धा दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण येथील हॉटेल कोणार्क नजीक असलेल्या महायुती संपर्क कार्यालयात संपन्न होणार आहे. स्पर्धेचा विषय “तांदळापासून पौष्टिक पदार्थ” असा असून, सहभागी स्पर्धकांना तांदळावर आधारित नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी पदार्थ सादर करायचे आहेत.

टाइम्स स्पेशल

या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी विद्या फर्नांडिस (७७६७०३३३६४), प्रियांका मेस्त्री (९३५६५२०२८०), मार्टीना फर्नांडिस (८३९०६७४७५६), चित्रा हरमलकर (८८५७०४२६२८), प्रमिला मोर्जे (८४११८४६६८५) आणि देवयानी शिर्सेकर (७०३०४५६८५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे. या स्पर्धेसाठी मालवण शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg