loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर चिखली येथे गुरे-ढोरे, शेळ्या-मेंढ्याच्या उपबाजाराच्या आवाराचे आम. भास्कर जाधव यांच्या हस्ते उदघाटन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत कार्यालय शेजारी पाळीव प्राणी, गुरे - ढोरे, शेळ्या - मेंढ्या यांच्या उपबाजाराचा उदघाटन सोहळा चिपळूण गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी तसेच ग्रामपंचायत चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार भास्कर जाधव आणि रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यवर अध्यक्षांनी व संचालकांनी आणि सरपंच मानसी मंगेश कदम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी फीत कापून व दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुरे - ढोरे, शेळ्या - मेंढ्या यांच्या उपबाजार आवाराचा उदघाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर चिखली ग्रामपंचायतच्या सरपंच मानसी मंगेश कदम, सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम तसेच ग्रामपंचायतच्या सदस्य आणि ग्रामस्थांकडून मान्यवरांचे शाल, बुके देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

यावेळी विचारपिठावर बाजार समितीचे सभापती आणि स्वागताध्यक्ष संदीप सुर्वे, सरपंच मानसी मंगेश कदम, गुहागर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश (दादा) सावंत, मधुकर दळवी, हेमंत माने, स्नेहलताई बाईत, विजय टाकळे, नैनेश नारकर, पांडुरंग कदम, प्रियांका माने, उपसरपंच सुभाष दळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, रवींद्र आंबेकर, भगवान (दादा )कदम आदी. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला चिखली पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg