loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी कुंदाताई खेडेकर यांचे निधन

चिपळूण (प्रतिनिधी) - चिपळूणचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या पत्नी श्रीमती कुंदाताई खेडेकर यांचे आज मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी श्री क्षेत्र वाराणसी येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७१ वर्षांच्या होत्या. कुंदाताई खेडेकर या सामाजिक, शैक्षणिक व महिला संघटनांच्या माध्यमातून सक्रियपणे कार्यरत होत्या. वैश्य समाज, चिपळूण तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थांवर त्या विश्वस्त म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. याशिवाय प्रगती महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे नेतृत्व केले. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याने त्या सर्वदूर परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, एक कन्या तसेच खेडेकर कुटुंबातील आप्तजन असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे चिपळूण शहरात व सामाजिक क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg