loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पाठपुराव्याने सावंतवाडी शहरातील जीर्ण पाईपलाईनची दुरुस्ती

सावंतवाडी : शहरातील मुख्य बाजारपेठ असणार्‍या नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत होता. मुख्य बाजारपेठेतून ही नळपाण्याची लाईन गेली होती. निवडणुक प्रचारावेळी याबाबत नागरिकांनी आपल गार्‍हाणे मांडले होत. यानंतर देव्या सुर्याजी यांनी तात्काळ प्रशासनाला कल्पना दिली होती. प्रभाग ६ चे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७ दिवसांत त्यांनी हे काम पूर्णत्वास आणलं असून यामुळे १० कुटूंबांना स्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. या १० कुटूंबांना गढूळ दुषीत पाणीपुरवठा होत होता. पाईप लाईन जीर्ण झाल्याने ड्रेनेज चे पाणी त्यात घूसून मोठी समस्या निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्याची दुसरी सोय नसल्याने याच पाण्याचा वापर हे लोक करत होते. यात अनेकांना आजारी देखील पडावं लागलं. न.प. निवडणुक दरम्यान प्रचारावेळी लोकांनी आपली कैफियत मांडली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर देव्या सुर्याजी यांनी नगरपरिषदेला कल्पना देत तात्काळ यावर उपाययोजना करण्यास सांगितली होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७ दिवसांत त्यांनी याबाबत पाठपुरावा केला. मुख्य बाजारपेठेतून जाणारी ही पाईप लाईन बदलत नवी लाईन घालण्यात आली. त्यामुळे मंगळवारपासून या १० कुटूंबांना स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झाला आहे. गेले दिड महिना दुषित पाणी पुरवठा त्यांना होत होता. यासाठी नागरिकांनी नगरसेवक देव्या सुर्याजी व न.प. प्रशासनाचे आभार मानले आहेत. मुख्य बाजारपेठेतील ही लाईन बदलण मोठं आव्हान होत. यासाठी प्रयत्न करणारे पाणी पुरवठा चे संजय पोईपकर, इंजिनिअर दिनेश बर्डे, प्लंबर जावेद यांच्यासह सहकार्य करणारे बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांचे नगरसेवक सुर्याजी यांनी आभार मानले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg