loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडीचा विळखा; पार्किंगचा प्रश्न जटील, उपाययोजना करण्याची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरातील प्रमुख मार्गांवर आणि बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात वाढलेली वाहनांची संख्या आणि नियोजित पार्किंग व्यवस्थेचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, नवनिर्वाचित नगरपरिषदेने पोलिसांच्या मदतीने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे. ​शहरातील गांधी चौक ते जयप्रकाश चौक, भवानी चौक ते मिलाग्रिस हायस्कूल आणि मच्छी मार्केट परिसरात वाहनांच्या रांगा लागत आहेत. विशेषतः श्रीराम वाचन मंदिर ते गांधी चौक (डॉ. खानोलकर दवाखाना रस्ता) या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात असल्याने हा रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. आर. पी. डी. हायस्कूल, कळसुलकर हायस्कूल आणि मिलाग्रिस हायस्कूल भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी रस्त्यावर मोठी गर्दी होते. अशा वेळी बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना मार्ग काढताना कसरत करावी लागते, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. ​सध्या नगरपरिषदेसमोर वाहतूक पोलीस तैनात असतात, मात्र शहरातील अन्य महत्त्वाच्या नाक्यांवर पोलिसांची अनुपस्थिती जाणवत आहे. ​चिटणीस नाका, ​शिवाजी चौक,​गांधी चौक, व जयप्रकाश चौक या ठिकाणी पोलीस नसल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असून वारंवार कोंडी होत आहे.

टाईम्स स्पेशल

रस्त्याच्या एकाच बाजूला दुचाकी लावण्याची कडक अंमलबजावणी करावी. चारचाकी वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र आणि पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी. दुकानांसमोर तासनतास वाहने उभी राहणार नाहीत याची खबरदारी दुकानदारांनी आणि प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे. "शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगचा प्रश्न जटील झाला आहे. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून या समस्येतून शहराची सुटका करावी." असे मत सावंतवाडीतील व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केले आहे. ​आता नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस विभाग या वाढत्या वाहतूक कोंडीवर नेमकी काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg