loader
Breaking News
Breaking News
Foto

ओझर विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंचायत समिती मालवणचे माजी सभापती उदय परब, उद्घाटक माजी मुख्याध्यापिका उषा मुरवणे व प्रमुख पाहुण्या माजी मुख्याध्यापिका शोभा पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उषा मुरवणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अभय शेर्लेकर यांनी अहवाल वाचन केले. शाळेचे कलाशिक्षक एस. जे. सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'वर्षा' या हस्तलिखिताचे प्रकाशन उषा मुरवणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना अनेक दात्यांनी दिलेली रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळेसाठी विनामूल्य अध्यापनाची सेवा देत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी विजय नातू यांचा कांदळगाव येथील माता पालकांनी सत्कार केला. तसेच प्रशालेच्या वतीनेही विजय नातू व अल्प मानधनावर शाळेसाठी सेवा देत असलेल्या महिला शिक्षिका सुनयना पवार-कदम यांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या शोभा पेडणेकर यांनी आपल्या मनोगतातून 'ओझर विद्यामंदिर पंचक्रोशीतील पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश ओझर विद्यामंदिरमध्येच घ्यावा' असे आवाहन केले. कांदळगावचे सरपंच रणजीत परब, ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी तथा केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, माजी विद्यार्थी तथा उद्योजक उमेश कोदे यांनीही आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले. तर अध्यक्षीय भाषणातून उदय परब यांनी ओझर विद्यामंदिरच्या विकासासाठी आपण सर्वांनी मिळून साथ देऊया, असे आवाहन केले. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी कांदळगावच्या ग्रामपंचायत सदस्या शारदा मुळये, मधुरा परब, शालेय समिती सदस्य विजय कांबळी, श्रीराम परब, विजय शेलटकर, कांदळगाव पोलीस पाटील, अक्षिता राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पालक अपर्णा पालव, संजना कुऱ्हाडे व कांदळगाव येथील माता पालकांचे सहकार्य लाभले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन शिक्षक पांडुरंग राणे यांनी केले, तर आभार स्नेहसंमेलन प्रमुख प्रवीण पारकर यांनी मानले.

टाईम्स स्पेशल

सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गायन कार्यक्रमही झाले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासह उदय परब व शालेय समिती सदस्य विशाल राणे आदी उपस्थित होते. स्नेहसंमेलनाच्या नियोजनासाठी स्नेहसंमेलन प्रमुख प्रवीण पारकर, शालेय सांस्कृतिक मंत्री अस्मी पारकर, लाजरी कांदळगावकर, मधुसूदन परुळेकर, प्रकाश खोडके, रविराज जाधव तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाजरी कांदळगावकर व तृप्ती परुळेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg