loader
Breaking News
Breaking News
Foto

इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड (आय.ई.ओ.) परीक्षेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकावली 30 सुवर्ण पदके

खेड - विज्ञान ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड (आय.ई.ओ) प्रथम पातळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांनी इयत्तानिहाय्य 30 सुवर्ण पदके पटकावली तर सहा विद्यार्थ्यांनी इंग्लिश ऑलिंपियाड (आय.ई.ओ)परीक्षेच्या द्वितीय पातळीवर आपले स्थान निश्चित केेले. शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा आणि व्याकरण यावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड (आय.ई.ओ) परीक्षा ही आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ठ होतात. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ठ होऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुवर्ण पदक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मोहम्मद पोत्रिक (इयत्ता - पहिली), स्वरा पवार (इयत्ता - पहिली), अन्वय भोई (इयत्ता - पहिली), रेयांश राऊत (इयत्ता - दुसरी), स्पंदन गायकवाड (इयत्ता - दुसरी), क्षिती शिंदे (इयत्ता - दुसरी), सौम्या माणके, (इयत्ता - तिसरी), अहमद मुसा, (इयत्ता - तिसरी), रफान रावल (इयत्ता - तिसरी), वरद टोंपे (इयत्ता - चौथी), शौर्या मोरे (इयत्ता - चौथी), शिव गवस (इयत्ता - चौथी), श्राव्या जोशी (इयत्ता - पाचवी), समर्थ खडपेकर (इयत्ता - पाचवी), शौर्य बनाफर (इयत्ता - पाचवी), पूर्वी सिंग (इयत्ता - सहावी), अशर चौगुले (इयत्ता - सहावी), यामीन तांबे (इयत्ता - सहावी), साराह परकार (इयत्ता - सातवी), स्वप्निष्क गोस्वामी (इयत्ता - सातवी), सार्थक मोरे (इयत्ता - सातवी), जिया चव्हाण (इयत्ता - सातवी), सुमित भोसले (इयत्ता - आठवी), शौर्य गवस (इयत्ता - आठवी), त्रिवेणी गमरे (इयत्ता - दहावी), नील बारटक्के (इयत्ता - दहावी, श्राव्या निकम (इयत्ता - दहावी), निधी मालू (इयत्ता - अकरावी), आस्था जाधव (इयत्ता - अकरावी), इब्राहिम चौगुले (इयत्ता - अकरावी) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे त्यांना पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

वरील यशस्वी विद्यार्थ्यांमधील सौम्या माणके, शिव गवस, श्राव्या जोशी, यामीन तांबे, सार्थक मोरे, शौर्य गवस, नील बारटक्के, निधी मालू या आठ विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेच्या द्वितीय पातळीवरील परीक्षेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व इंग्रजी विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg